Gold Rate Today: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात काहीसा चढ-उतार दिसून आला आहे. 2024 च्या शेवटी सोनं आणि चांदीने चांगला परतावा दिला होता, आणि 2025 मध्येही आर्थिक धोरणांवर आणि फेडरल बँकेच्या निर्णयांवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतींमध्ये 440 रुपयांची घट दिसून आली, परंतु दिवसाच्या सुरुवातीला 78,800 रुपयांवर स्थिरावली आहे. मागील वर्षभरात सोन्याने 23.5 टक्क्यांची वाढ नोंदवली असून, सध्या ते 78,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे.
चांदीच्या किंमतींमध्येही काहीशी घट झाली असून, आज ती 89,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील सत्रात चांदी 91,700 रुपयांवर होती, परंतु आज 2,000 रुपयांनी घट नोंदवली आहे.
1 ग्रॅम सोनं
8 ग्रॅम सोनं